Thursday, February 9, 2017

... And he 'said' I Love You !

सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!
शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?
झाले असे.. बरेच दिवसांपासून हेरून ठेवलेले aacorn AAC हे अ‍ॅप मी शेवटी विकत घेतलेच. हे होते तब्बल ८०$चे.. तशी मी फुकट रोजच काहीतरी डाउनलोड करत असते. बर्‍याच अ‍ॅप्सकडे मुलगा ढुंकूनही पाहात नाही. हेच त्याने ह्याही अ‍ॅपबरोबर केले असते तर फारच महागात पडले असते. खूप विचार करता शेवटी आपल्या मुलाला होईल उपयोग ह्याचा असा मनाने कौल दिला व घेतले.
थोडी माहिती : aacorn हे एकप्रकारचे AAC अ‍ॅप आहे. AAC augmentative assistive communication. ज्यांना बोलता येत नाही / ऐकू येत नाही / इतर लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत - ज्यात ऑटीझम पण येतो, अशा मुलांना कम्युनिकेट करण्यासाठीची ही एक पद्धत. पूर्वीच्या लेखांमध्ये लिहीलेली पेक्स(पिक्चर एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम)चेच हे थोडे प्रगत रूप. ह्यात जनरली ग्रुपनुसार शब्दांचे चौकोन असतात, ते दाबून वाक्यं तयार करायची व ते मशिन/ अ‍ॅप तुमचे वाक्य वाचून दाखवते. थोडक्यात तुमच्या मुलाचा आवाज! (आवाज नावाचेही एक अ‍ॅप आहेच! :) )
ऑटीझम जगतात http://www.assistiveware.com/product/proloquo2go प्रोलोकोटूगो हे अ‍ॅप फारच प्रसिद्ध आहे. परंतू एकतर ते महाग आहे ( जवळजवळ २५०$) व तिथली ती ग्रीड सिस्टीम काही मला आवडत नव्हती. शेवटी हे एकॉर्न पसंत पडले कारण त्यात ग्रीड व्ह्यू नसून ट्री व्ह्यू आहे. तुम्ही जसेजसे अ‍ॅप वापरत जाल तसे ते अ‍ॅप प्रेडीक्टही करू लागते. एकंदरीत उपयोगी पडेल असे वाटले.
व उपयोग झालाच. विकत घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी, मुलगा शाळेतून आला व आयपॅड मागू लागला. (पेक्सचे आयपॅडचे चित्र देऊन. ) मी त्याला दिला नाही. व हे अ‍ॅप इन्ट्रोड्युस केले. आय वाँट आयपॅड हे वाक्य कसे तयार करायचे शिकवले. व त्याने लगेचच तसे करून दाखवले. मग त्याला अर्थातच आयपॅड दिला मी. पण या नवीन संवादाच्या माध्यमामुळे मुलगा खुष झाला. क्युरिअस झाला. व एके दिवशी त्याने उगीचच ते अ‍ॅप चाळत असताना आय लव्ह यू हे वाक्य तयार केले.
aacorn_iloveyou
खूष होऊन माझ्याकडे आयपॅड घेऊन आला व तेच सेम वाक्य ५-७ वेळेस तरी मला ऐकवले! :) आईकडून रोज सत्रांदा तरी ऐकलेले वाक्य परत आईला ऐकवू शकलो याचा त्याला इतका आनंद झाला !! त्याने तोंडातून ते शब्द नाही उच्चारले तरी एकाअर्थाने he 'said' I Love You !
मला तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी आठवण मिळाली!! ती तुमच्याशी शेअर केल्यावाचून कशी राहीन मी!?
Have a Happy Mother's Day !!

No comments:

Post a Comment